राहुल गांधींचा पायगुण भाजपसाठी लाभदायक : योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath
Yogi Adityanath

यवतमाळ : "उमरखेडला येत असताना नांदेड विमानतळावर उतरलो. आज महाराष्ट्रात प्रचाराला कोण कोण येत आहेत, याची माहिती घेतली. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी येणार असल्याचे कळले. राहुल महाराष्ट्रात प्रचाराला येणार म्हटल्यावर पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार हे त्रिवार सत्य असून, ज्या ज्या राज्यात राहुल प्रचाराला जातात, तेथे कॉंग्रेसचा पुरता बिमोड होतो व भाजपची एकछत्री सत्ता येते. राहुलचा पायगुण भाजपसाठी लाभदायी आहे', असे उपरोधिक वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. येथे रविवारी (ता. 13) आयोजित महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षांत देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत देश जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वसामान्यांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. मोदींच्या नेतृत्वात काश्‍मीरमधील 370 कलम रद्द झाले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com