ऍड. गडलिंग यांच्या घरावर छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

नागपूर - एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी छापे मारणे सुरू केले आहे. याच कारवाईचा भाग म्हणून नागपुरातील प्रसिद्ध वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यांच्या घरून काही दस्तावेज, पेनड्राइव्ह, सीडी, डीव्हीडी, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले आहेत.

या संपूर्ण प्रकाराबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास पुणे येथील विशेष शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नकार दिला. 150 ते 200 पोलिसांचा ताफा ऍड. गडलिंग यांच्या घरी पहाटेच्या सुमारास आला. त्यांनी घरातून वाढदिवस आणि लग्नाच्या फोटो अल्बमसह मुलांची शालेय पुस्तकेसुद्धा जप्त करून नेल्याची माहिती आहे.

तासाभरात समर्थकांची गर्दी
ऍड. गडलिंग यांच्या घरावर छापा टाकल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे तासाभरातच शहरातील अनेक सहकारी वकील, कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवर; तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. पोलिसांचा ताफा पाहताच हा राज्य शासनाचा केवळ दडपशाहीचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया वेळी उमटल्या.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शासनाच्या दडपशाहीमुळे चळवळ आणखी तीव्र होईल. अशा कृतीला आम्ही जुमानणार नाही. आवाज दाबण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे नेते प्रयत्न करत आहेत. दोनशे पोलिसांनी वस्तीला घेरून माझ्या घराची झडती घेतली. काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्याने लग्नाची डीव्हीडी, वाढदिवसाचे फोटो असलेला पेनड्राइव्ह आणि मुलांची परीक्षा सुरू असताना त्यांचीही पुस्तके पोलिसांनी जप्त केली.
- ऍड. सुरेंद्र गडलिंग

Web Title: raid on advocate surendra gadling home