झन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर छापा

प्रल्हाद कांबळे  
शनिवार, 26 मे 2018

नांदेड : झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी दहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख अडीच हजारासह ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कुंटूर पोलिसांनी कोकलेगाव शिवारात शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास केली. 

नायगाव तालुक्यातील कोकलेगाव शिवारात झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची महिती कुंटूर पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक अजीत बिराजदार यांनी आपल्या सहकाऱ्यासह शुक्रवारी सायंकाळी या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी डावावरून मारोती माधवराव गाजलवाड, बालाजी गाजलवाड, माधव कदम, हनमंत मिरकुटे, ज्ञानेश्‍वर नारे, रुकाजी झगडे, मारोती इबितवार, बालाजी नारे, नारायण नारे आणि नारायण जुणे यांना अटक केली. तर काही जण पोलिस दिसताच पसार झाले.  रोख अडीच हजार आणि एक दुचाकी (क्र. एमएच२६बी- एच-७९९७) व जुगाराचे साहित्य जप्त केले. या सर्वांना घेऊन कुंटूर पोलिस ठाण्यात स्थानबध्द केले. अजीत बिराजदार यांच्या फिर्यादीवरुन वरील दहा जुगाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. गिते हे करीत आहेत. 

Web Title: raid on jhanna-manna gambling base