हॉटेल तुलीतील पबवर छापा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

नागपूर :  सदरमधील हॉटेल तुली इंटरनॅशनल आर. एन. व्ही. व हॉटेल व्ही-5 (लोकल) या ठिकाणी मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या पबवर नवनियुक्‍त डीसीपी विनिता साहू यांनी छापा घातला. या छाप्यात जवळपास 30 ते 40 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अनेक मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत पब, बार आणि नृत्याचे कार्यक्रम सुरू असतात. याची माहिती डीसीपी विनिता साहू यांना मिळाली. त्यांनी शनिवारी मध्यरात्री एका पथकासह हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे छापा घातला. या छाप्यात काही तरुण-तरुणी तोडक्‍या कपड्यात पबमध्ये आढळून आले. काही युवती आणि युवक नशेच्या धुंदीत होते, अशी माहिती आहे. पोलिसांनी हॉटेलचा व्यवस्थापक संदीप सुरेश सिराम (वय 29, रा. लेंड्रापार्क, रामदासपेठ) याला ताब्यात घेतले. मध्यरात्रीनंतरही परवाना नसताना लाउडस्पीकरच्या मोठा आवाज होता. तसेच युवक-युवती धुंदीत नाचत होते. हॉटेल व्ही फाइव्हमध्येसुद्धा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यातही पोलिसांनी हॉटेलवर दंडात्मक कारवाई केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raid on a pub in Tully hotel