हायप्रोफाईल "सेक्‍स रॅकेट'वर छापा

मंगळवार, 15 मे 2018

शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला (एसएसबी) भष्ट्राचाराची कीड लागल्यामुळे शहरात देहव्यापाराचे लोन पसरले आहे. सुरूवातील शहराबाहेर होणारा देहव्यापार शहरातील पॉश हॉटेल्स, फार्म हाऊस, बंगले आणि स्पा-सलून आणि ब्युटीपार्लरपर्यंत येऊन पोहचला. शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली खुलेआम देहविक्री होत असून याकडे पोलिसांचे "अर्थपूर्ण' दुर्लक्ष होत आहे

नागपूर ः शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या सदर परिसरातील "बॉडी स्पा' नावाने सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात तीन युवतींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. युवतींना पैशाचे आमिष दाखवून देहविक्रीस प्रोत्साहन देणाऱ्या दोन दलालांना सदर पोलिसांनी अटक केली. राहूल मदनलाल गुप्ता (वय 39, रा. एमआयटी लेआऊट, उमरेड रोड, नागपूर) आणि अजय मुरलीधर शर्मा (वय 32, रा.मानकापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत.
शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला (एसएसबी) भष्ट्राचाराची कीड लागल्यामुळे शहरात देहव्यापाराचे लोन पसरले आहे. सुरूवातील शहराबाहेर होणारा देहव्यापार शहरातील पॉश हॉटेल्स, फार्म हाऊस, बंगले आणि स्पा-सलून आणि ब्युटीपार्लरपर्यंत येऊन पोहचला. शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली खुलेआम देहविक्री होत असून याकडे पोलिसांचे "अर्थपूर्ण' दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झटपट पैसा कमविण्याच्या नादात महिला आणि युवतीच नव्हे तर शाळकरी मुलीसुद्धा देहव्यवसायाकडे वळल्या आहेत. सेक्‍स रॅकेट संचालकांनी आता ऑनलाईन बुकींगवरून युवती उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली असून पोलिस केवळ बघ्यांची भूमिका घेत आहे.
युवतींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष
राहुल गुप्ता आणि अजय शर्मा या दोघांनी सदर रेसिडेन्सी रोडवर मनपाच्या दवाखान्याच्या बाजुला "हेवन स्पा-सलून' उघडले होते. दोघांनीही युवतींना नोकरीचे आमिष दाखवून मुलाखती घेतल्या. सुरूवातीला काही दिवस स्पा-मसाजची कामे करण्यात आली. मात्र, युवतींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे हेवन स्पामध्ये सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत ग्राहकांची गर्दी होत होती. परिसरातील नागरिकांना प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सदर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता स्पामध्ये बनावट ग्राहक (पंटर) पाठवून बॉडी मसाज करण्याचा बहाणा केला. तेथे देहव्यापारासाठी असलेल्या तीन मुलींना बोलविण्यात आले. पाच हजार रूपयांत सौदा ठरला. पंटरने पैसे देण्याची तयारी दर्शविली. रूम उपलब्ध करून देताच पंटरने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी छापा घालून तीनही युवतींना शरीरविक्री करताना रंगेहात ताब्यात घेतले. दोन्ही दलालांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Raid on Sex Racket

टॅग्स