‘ब्लश फॅमिली स्पा’मधील सेक्‍स रॅकेटवर छापा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

नागपूर - गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ‘ब्लश फॅमिली सलून अँड स्पा’मध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत दोन महिला दलालांना अटक केली, तर एका तरुणीला ग्राहकांशी अश्‍लील चाळे करताना ताब्यात घेतले. ‘सकाळ’ने ‘देहव्यापाराची दलदल’ नावाने वृत्तमालिका प्रकाशित करताच शहरातील सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखा छापे घालत आहे, हे विशेष. 

गिट्टीखदान काटोल मार्गावरील हनुमान चौकातील एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर ‘ब्लश फॅमिली सलून अँड स्पा’ येथे मसाजच्या नावाने सेक्‍स रॅकेट सुरू होते. चंदा ऊर्फ नक्‍कू राजेश खापर्डे (२५, रा. भानखेडा, मोमिनपुरा) आणि तनुजा पराग बागडे (इंदोरा, कामठी रोड) या दोन्ही दलाल अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन तरुणींना एक हजार रुपये तासाप्रमाणे स्पामध्ये मसाजची कामे करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांना मिळाली. त्यांनी आज (ता. २६) दुपारी स्पाजवळ सापळा रचला. पंटर पाठवून नक्‍कू आणि तनुजाची भेट घेतली. तिने दहा हजार रुपये प्रतितास याप्रमाणे सौदा केला. पंटरला आत पाठविताच त्याने इशारा केला. 

सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर, निशा मोरे यांच्या मदतीने छापा घातला. पोलिसांनी नक्‍कू खापर्डे आणि तनुजा बागडे यांच्याकडून देहव्यापारासाठी वापरात येणाऱ्या साहित्य जप्त केले. तसेच २१ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. ‘सकाळ’च्या दणक्‍यानंतर पोलिसांना सेक्‍स रॅकेटचे कनेक्‍शन मिळत आहेत. मात्र, यात खाकीची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा आहे.

चंदावर दुसरा छापा
सध्या प्रजापतीनगर कळमन्यात राहणाऱ्या चंदा खापर्डे हिच्या सेक्‍स रॅकेटवर यापूर्वीही गुन्हे शाखेने छापा घातला होता. तिला पोलिसांनी अटक केली होती. तिचे संपूर्ण विदर्भात कनेक्‍शन आढळले होते. अल्पवयीन आणि शाळकरी मुली आंबटशौकिनांपर्यंत पोहोचविण्यात चंदाचा हातखंडा आहे. चंदाचे प्रणाली जयस्वाल हिच्यासोबतही कनेक्‍शन आहे.

गिट्टीखदान पोलिस अनभिज्ञ कसे? 
गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून सेक्‍स रॅकेट सुरू होते. तेथील डीबी पथकाच्या दर महिन्याला मसाज सेंटरमध्ये भेटी होत होत्या. त्यामुळे नक्‍कू आणि तनुजा हिच्याकडे मिळालेला मोबाईल क्रमांक किंवा कॉल डाटावरून काही पोलिस कर्मचाऱ्यांचे बिंग फुटण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली.

Web Title: Raid on Sex Racket in Blush Family Spa