'रॅडिसन ब्लू'मधील सेक्‍स रॅकेट वर छापा

Sex-Racket
Sex-Racket

नागपूर - वर्धा मार्गावरील बहुतारांकित हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये चालत असलेल्या देहव्यापारावर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून एका दलाल महिलेला अटक केली. तसेच पीडित तरुणीची सुटका केली.

पूजा जितेंद्र रॉय असे अटक करण्यात आलेल्या दलाल महिलेचे नाव आहे. आरोपी ही तरुणींकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात सापळा रचण्यात आला. एका पंटरकडून दलाल महिलेशी संपर्क करण्यात आला. तिने मुलीचे छायाचित्र त्याला पाठवले. एक मुलीची निवड करण्यात आली. तासाला 10 हजार रुपये ठरले. पंटरकडून दलाल महिलेने पैसे स्वीकारले आणि रॅडिसन ब्लू हॉटेलच्या 202 क्रमांकाच्या खोलीत जायला सांगितले. पंटर खोलीत पोहोचताच त्याला मुलगी मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी दलाल महिलेला अटक केली. देहव्यवसायात सापडलेली तरुणी कोलकाताची आहे. तिला 15 दिवसांपूर्वी नागपूरला बोलावण्यात आले होते. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तिने आतापर्यंत तीन हॉटेल बदलले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

महिला दलालाचे संबंध इतर राज्यांत
प्राप्त माहितीनुसार, नोव्हेंबरमध्येही पोलिसांनी पूजाला पूनम चेंबरजवळून अटक केली होती. जामिनावर बाहेर येताच ती पुन्हा सक्रिय झाली. इतर राज्यांत सेक्‍स रॅकेट चालविणाऱ्या दलालांशी तिचे संबंध आहेत. वेबसाइटवर ती तरुणी उपलब्ध असल्याची माहिती ग्राहकांना देते. ती स्कोका नावाच्या ऑनलाइन साईटवर जाहिरात देऊन ग्राहकांना बोलावते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com