सेक्‍स रॅकेटवर छापा, भाव झाले चौपट 

अनिल कांबळे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील एका पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या एका महिलेची पोलिसांनी सुटका केली. तर महिलेला पैशाचे आमिष दाखवून शरीरविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या युगुलाला पोलिसांनी अटक केली. वैशाली राजू माकडे (वय (रा. अनंतनगर) आणि दीपक देवीदास राठोड (रा. बारशिंगी, यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांनी सेक्‍स रॅकेटवर छापेमारी सुरू केली होती. त्यामुळे देहव्यापार करणारे दलाल शहराबाहेर व्यवसायाला लागले होते. शहरात बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्‌दीत कस्तुरी नगरी येथील फ्लॅटमध्ये वैशाली माकडे आणि तिचा प्रियकर दीपक राठोड हे सेक्‍स रॅकेट चालवित होते. व्हॉट्‌सऍप आणि फोनवरून आंबटशौकींना मुली पुरवित होते. डीसीपी कदम यांना माहिती मिळताच आज बुधवारी दुपारी चार वाजता सापळा रचला. बनावट ग्राहक वैशालीकडे पाठविला. तिने सौदा पक्‍का करीत एका महिलेला फ्लॅटवर बोलावले. ग्राहकासोबत तिला पाठवताच पोलिसांनी छापा घातला. यावेळी महिलेला ताब्यात घेण्यात आले तर वैशाली आणि दिपकला अटक करण्यात आली. 

भाव झाले चौपट 
गुन्हे शाखेचा वचक असल्यामुळे मुख्य दलालांनी देहव्यापार बंद केला. मात्र, काहींनी चोरून-लपून सेक्‍स रॅकेट सुरू केले. आंबटशौकींनाना हेरून युवतींना पुरविण्याचे चौपट पैसे दलाल घेत होते. वैशालीनेही व्यवसायातील मंदीचा फायदा घेत बक्‍कल पैसा कमविल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांचा छापा पडू नये म्हणून, दलाल योग्य ती काळजी घेतल्यानंतरही छापे पडत आहेत. 

Web Title: Raid on Sex Racket in Nagpur