सेक्‍स रॅकेटमध्ये विदेशी तरूणी ताब्यात, गुन्हे शाखेचा छापा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

नागपूर : नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरूणींसह थेट विदेशी तरूणींचा बोलबाला आहे. त्यामुळे नागपुरात दर महिन्यात जवळपास 8 ते 10 विदेशी तरूणी "सेक्‍स रॅकेट'मध्ये नागपुरात येतात. अशाच प्रकारे पाचपावलीतील एका सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला असता दोन विदेशी तरूणींसह झारखंडमधील एका युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर आरोपी दलाल मोहम्मद सरफराज मेमन याला पोलिसांनी अटक केली. 
मोहम्मद मेमन हा गेल्या अनेक वर्षांपासून सेक्‍स रॅकेट चालवितो. त्याच्या संपर्कात गुजरात, मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, चेन्नई, ओरीसा, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यासह विदेशी तरूणी संपर्कात आहेत.

विदेशातील दलालांसोबत मो. सर्फराजचे संबंध आहेत. तो पाचपावलीतील मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ राय सोसायटीतील फ्लॅट क्र. 110 मध्ये सेक्‍स रॅकेट चालवित होता. त्याने गेल्या दहा दिवसांपूर्वीच बांगलादेशच्या दोन तरूणींना तर छत्तीसढगमधील रायपूर येथील एका तरूणीला देहव्यापार करण्यासाठी नागपुरात आणले होते. "हायफाय' असलेल्या तीनही तरूणींसाठी नोटा उडविणाऱ्या आंबटशौकीनांची गर्दी होत होती. गुन्हे शाखेचे निलेश भरणे यांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी खातरजमा केली. विदेशी युवती फ्लॅटमध्ये देहव्यापार करीत असल्याचे स्पष्ट होताच सापळा रचला. छापा घालून तीनही तरूणींना ताब्यात घेण्यात आले तर दलाल मो. सर्फराजला अटक करण्यात आली. 

पाच हजार रूपयांत सौदा 
सोमवारी पंटर पाठवला. पंटरने पाच हजार रूपयांत सौदा केला. त्याला दोन बांगलादेशी आणि एक रायपूरची तरूणी दाखविण्यात आली. त्याने एका बांगलादेशची तरूणी पसंत केली. मो. सर्फराजने दोघांना रूम उपलब्ध करून दिली. दरम्यान, पंटरने दबा धरून असलेल्या पोलिसांना इशारा दिला. पोलिसांनी बांगलादेशीसह अन्य युवतीला ताब्यात घेतले. 

वॉट्‌सऍपवर फोटो 
तीनही तरूणींचे नागपुरात फोटोसेशन करण्यात आले. त्यानंतर अर्धनग्नावस्थेतील फोटो वॉट्‌सऍपवर आंबटशौकीन ग्राहकांपर्यंत पाठविण्यात आले. फोटो दाखवून ग्राहकांना आकर्षित करण्यात आले. मो. सर्फराजने हा फंडा गेल्या दोन वर्षांपासून वापरत असल्याचे सांगितले. विदेशी तरूणींना विमानवारी करणे तसेच त्यांची पॉश "स्टार' हॉटेलमध्ये "सेटींग' करीत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. 

Web Title: raid on sex racket at Nagpur