हिंगोलीत रिपाईचे रेल रोको आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

हिंगोली - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने हिंगोली रेल्वे स्थानकावर मंगळवारी ( ता.११ ) सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले.

येथील रेल्वेस्थानका वर आयोजित आंदोलनात मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, वसंत मुळे, मिलिंद कवाने, सुरेश वाढे, सुनील इंगोले, रमेश इंगोले, सुभाष ठोके, बाबुराव इंगोले, काळूराम मोरे, शिवाजी पाईकराव, रामकिशन घोडके, विठ्ठल पंडित, विलास कवाने, मिलिंद केले  यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रेल्वे रोखून धरली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, श्री. आठवले यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थे मध्ये दिरंगाई करणाऱ्या अंबरनाथ येथील पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामधे पूर्णा येथून अकोलाकडे जाणारी रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकावर सुमारे अर्धा तास रोखून धरण्यात आली. त्यानंतर रेल्वे पोलिस व प्रशासनाकडे निवेदन सादर केले.

Web Title: Rail Roko movement of Hingoli Reap