धडधडत्या रेल्वेखाली येऊनही बचावला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर - वेळ सकाळी सातची... स्थळ नागपूर रेल्वेस्टेशन... प्रवाशांची लगबग सुरू होती... समोरून धडधडत मालगाडी येत होती... थरार अनुभवण्यासाठी एक तरुण अगदी फलाटाच्या टोकाला उभा झाला... जोरदार हॉर्नमुळे तो गडबडला... इंजिन काही अंतरावर असतानाच रुळावर कोसळला... बघ्यांच्या छातीत धस्स झाले... मालगाडी धडधड करीत पुढे निघून गेली... केवळ सुदैवानेच तो बचावला... मात्र हात खांद्यापासून वेगळा झाला... ही घटना ‘जिवावर बेतले, पण हातावर निभावले’ या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरली.

रोशन वाघाडे (२३) रा. नवेगाव, जि. भंडारा असे अपघातग्रस्त तरुणाचे नाव. तो काही कामानिमित्त नागपूर स्थानकावर आला होता. सोमवारी सकाळी परतीच्या प्रवासासाठी तो नागपूर रेल्वेस्थानकावर आला. फलाट क्रमांक १ वर उभा राहून तो गाडीची वाट बघत होता. बसायला सीट मिळावी म्हणून अनेक जण फलाटावर अगदी समोर राहण्याचा प्रयत्न करतात. थरार अनुभवण्यासह डब्यात लवकर शिरता यावे यासाठी रोशनही फलाटाच्या टोकावर उभा होता. समोरून रेल्वे येताना दिसली तो प्रवाशांची लगबगही वाढली. इंजिन जवळ येत असतानाच रोशन फलाटावर पडला. अनेकांच्या तोंडातून किंचाळी निघाली.

आरडाओरड सुरू असतानाच त्या मार्गावरून मालगाडी धडधडत पुढे निघून गेली. प्रवाशांनी बघितले तर रोशनचा उजवा हात खांद्यापासून वेगळा झाला होता. पण, जीव वाचला होता. प्रवाशांनी त्याला उचलून बाजूला केले.
घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोशनला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करून त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. चुकून पाय घसरल्याने पडल्याचे रोशनने सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी मात्र त्याने इंजिनपुढे उडी घेतल्याचा दावा केला आहे.

Web Title: railway accident roshan waghade life saving