रेल्वे प्रवासात मिळणारा चहा अगदीच भंकस!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नागपूर - रेल्वेत मिळणारा चहा अगदीच भंकस असून, तरतरीऐवजी ग्लानी आणणारा असल्याची तक्रार रेल्वे प्रवाशांनी थेट दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक शोभन बंदोपाध्याय यांच्याकडे केली. 

विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाची सूत्रे सांभाळल्यानंतर शोभना बंदोबाध्याय यांनी नुकताच विदर्भ एक्‍स्प्रेसमधून प्रवास करीत प्रवाशांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. खाद्यपदार्थांसह प्रवासी सुविधा, स्वच्छतेबाबतचा अभिप्राय जाणून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. यात चहासंदर्भात सर्वाधिक नापसंतीचा सूर होता. शिवाय खाद्यपदार्थांसह प्रवासी सुविधांबाबतही प्रवासी फारसे खूश नसल्याचे या वेळी पुढे आले.

प्रवासीभिमुख सुविधांसह खाद्यपदार्थांचा दर्जा राखता यावा, यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जातात. पण, चहाचा दर्जा सुधारण्यासाठी कधीच पावले उचली गेली नाहीत. परिणामी ‘गरम गोड पाणी’ ही रेल्वेत मिळणाऱ्या चहाची ख्याती वर्षानुवर्षे कायम आहे. यामुळेच कितीही इच्छा झाली तरी प्रवासी नाक मुरडून चहाला नकार देतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात मात्र त्याच पाणीदार चहावर समाधान माणून घ्यावे लागते. हीच बाब प्रवाशांनी डीआरएम मॅडमसोबत चर्चेदरम्यान अधोरेखित केली. प्रवाशांच्या प्रतिक्रियांसंदर्भात प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर भावना व्यक्त करताना बंदोपाध्याय यांनी पेंट्रीकारवर आमचे थेट नियंत्रण नसल्याची अगतिकता व्यक्त केली. 

याप्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आय. एच. राठोड, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव त्यांच्या सोबत होते.

Web Title: railway journey tea issue shobhana bandopadhyay