भावी पोलिसांनी गिरवले रेल्वे सुरक्षेचे धडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नागपूर - पोलिस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थ्यांनी मंगळवारी प्रत्यक्ष नागपूर रेल्वेस्थानकाला भेट देऊन लोहमार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासह रेल्वे सुरक्षेचे धडे गिरवले. लोहमार्ग पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रेल्वे अपघातात वाढ झाली असून, समाजकंटकांकडून घातपाती कारवाया केल्या जात आहेत. अशा स्थितीत अपघात किंवा घातपाताच्या प्रसंगांमध्ये कौशल्याने परिस्थिती हाताळता यावी, या दृष्टीने पोलिस महासंचालक, लोहमार्ग कनकरत्नम यांच्या निर्देशानुसार ‘रेल्वे सेक्‍युरिटी मॉड्यूलअंतर्गत या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. गेल्या दोन महिन्यांत रेल्वे रुळावर घातपात करणारे प्रकार घडले आहेत. काही प्रकार खोडसाळपणातून झाले. रुळावर दगड ठेवणे, लोखंडी पट्टी ठेवणे आदी रेल्वे अपघातासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कारवायांना बसण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणार्थ्यांना परिपूर्ण माहिती असावी, या उद्देशानेच हे प्रशिक्षण घेण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

रेल्वे पोलिस, त्यांची कार्यप्रणाली, गुन्हे आणि गुन्हे उघडकीस आणण्याची पद्धत आदी बाबींची माहिती पाटील यांनी दिली.

बॉम्बशोध व नाशक पथकासह विविध उपकरणांची हाताळणी, बॉम्ब आणि अमली पदार्थ शोधण्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. आरपीएफ ठाण्यातील सीसीटीव्ही कक्षात होणारे मॉनिटरिंग, बॅगेज स्कॅनर आदींबाबत प्रशिक्षणार्थ्यांनी जाणून घेतले.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, पोलिस उपविभागीय अधिकारी अनंत केंदळे, पोलिस निरीक्षक अभय पान्हेकर, आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, संजय सिंग, उपनिरीक्षक राजेश सरोदे, खुशाल शेंडगे उपस्थित होते.

Web Title: Railway safety lessons to future police