तांत्रिक कारणामुळे रेल्वेस्थानकावरील बॅटरी कारला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नागपूर - अपंग, आजारी आणि वृद्ध प्रवाशांच्या सुविधेसाठी सामाजिक संस्थांकडून  नागपूर रेल्वेस्थानकावर नि:शुल्क स्वरूपात बॅटरी कारची सेवा उपलब्ध केली आहे. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे बुधवार दुपारपासून दोन्ही बॅटरी कार बंद असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये नागपूरला हेल्थ हबचे स्वरूप आले आहे. लगतच्या राज्यांमधून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यासह अपंग, वृद्धांना फलाटापर्यंत होणारा त्रास कमी करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दोन बॅटरी कार उपलब्ध करून दिल्या आहेत. 

या दोन्ही गाड्यांद्वारे प्रवाशांना प्रवेशद्वारापासून फलाटापर्यंत सोडून दिले जाते. या सेवेचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. नागपूरपाठोपाठ विभागातील अन्य स्थानकांवर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली. 

बुधवारी दुपारी अचानक दोन्ही गाड्यांमध्ये दोष निर्माण झाला. यानंतर जुजबी दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, दोष दूर न झाल्याने गुरुवारीसुद्धा ही सेवा बंदच राहिली. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. काहींनी कुलींची मदत घेतली. पण, बॅटरी कार बंद असल्याने कुलींचेही दर चांगलेच वधारले होते. 

बॅटरीवर चालणाऱ्या या पर्यावरणपूरक वाहनाच्या देखभाल दुरुस्तीचे कार्य नियमित संबंधित संस्थेकडून केले जाते. परंतु, तांत्रिक दोष दुरुस्त करणारे मेकॅनिक नागपुरात उपलब्ध नसल्याने बाहेरून बोलावण्यात आले. सध्या मेकॅनिकची प्रतीक्षा केली जात आहे.

ज्येष्ठांची दमछाक
बॅटरी कारचा पर्याय म्हणून स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयात व्हीलचेअर उपलब्ध आहे. परंतु, त्याची फारशी कल्पना बाहेरच्या प्रवाशांना नसते. परिणामी सोबतच्या आजारी, वृद्ध प्रवाशांना आधार देण्यासह सामान ओढताना अनेकांची दमछाक होत आहे.

Web Title: railway station battery car break by technical problem