रेल्वे तिकीट हवंय, बस पाच मिनिटे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

नागपूर : रेल्वे तिकीट मिळविण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याचा अनुभव बहुतेक सर्वांच्याच वाट्याला आला आहे. आता रेल्वे तिकीट मिळविण्याचे ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे रेल्वे तिकीट मिळविणे सोपे झाले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तर खिडकीपर्यंत पोहोचल्यास पाच मिनिटांच्या आत तिकीट मिळते, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. तिकीट मिळण्यास विलंब झाल्यास तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात भारतीय रेल्वेने जागतिक पटलावर श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. प्रवासी सुविधांवर विशेषत्वाने भर दिला जातो. यामुळे रेल्वेची प्रवासी संख्या सर्वाधिक आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानेसुद्धा प्रवासी सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रवाशांना कमीत कमी अडचणी येतील या दृष्टीने उपययोजना करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून रेल्वे तिकीट मिळविण्यासाठी लागणारा वेळ कमीत कमी करण्याकडे लक्ष दिले गेले. परिणाम म्हणून खिडकीवर येणाऱ्या प्रवाशाला पाच मिनिटांच्या आतच तिकीट मिळावे, याची सुनिश्‍चितता करण्यात आली आहे. पाच मिनिटांच्या आत रेल्वे तिकीट मिळणे हा प्रवाशांचा अधिकार आहे. त्यापेक्षा अधिक वेळ लागत असले तर तक्रारीसाठी 9766342277 हा हेल्पलाइन क्रमांकसुद्धा सुरू केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway ticket must, just five minutes!