रेल्वे तिकीट खरेदीचा ‘अगाऊ’पणा भोवला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

नागपूर - साचलेल्या पाचशे, हजाराच्या जुन्या नोटा खपविण्यासाठी काहींनी रेल्वे तिकीटांमध्ये गुंतवण्याची अनोखी शक्कल लढवली. रेल्वे प्रशासनाने मात्र त्यावर तोड शोधून काढला आहे. १० हजारांपेक्षा अधिक रकमेचे तिकीट रद्द केल्यास तातडीने पैसे नव्हे तर तिकीट डिपॉझीट रिसीप्ट (टीडीआर) मिळणार आहे. त्यामुळे तिकीट खरेदीचा ‘आगाऊ’पणा चांगलाच भोवला आहे. आता पैसे परत मिळविण्यासाठी चांगलीच माथापच्छी करावी लागणार आहे. 

रेल्वे, विमान, बसेच्या तिकीटांसाठी पाचशे, हजाराच्या जुन्या नोटा वापरण्याची मुभा होती. काहींनी ही संधी ‘इन कॅश’ करून घेण्याची क्‍लुप्ती शोधली. मिळेल त्या मार्गावरील रेल्वेच्या तिकीटांची खरेदी केली. काही दिवसांनी तिकीट रद्द करून पैसा परत मिळेल हा त्यांचा विश्‍वास होता. पण, त्यांचा हा विश्‍वास डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराप्रमाणेच ठरला. या आगाऊपणा विषयी कळताच रेल्वे प्रशासनाने ‘चोरावर मोर’ ठरणारा निर्णय घेतला. ९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी १० हजार रुपयांहून अधिक रकमेच्या तिकीट खरेदी करणाऱ्यांना त्या रद्द करण्यासाठी मोठी माथापच्छी करावी लागणार आहे. तिकीट रद्द करताच त्यांना रोख रकमेऐवजी टीडीआर मिळेल. ते घेऊन रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापक कार्यालयातील मुख्य दावा अधिकाऱ्याकडे मोबदल्यासाठी दावा करावा लागेल. प्रकरणांची संपूर्ण खातरजमा केली जाईल. त्यानंतरच तिकीटांची रक्कम इसीएसद्वारे थेट संबंधितांच्या खात्यात जमा केली जाईल किंवा मोबदल्याचा धनादेश संबंधितांच्या घरी पाठविण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले. या दोन्ही पद्धतींद्वारे होणाऱ्या व्यवहाराची नोंद संबंधितांच्या बॅंक खात्यावर होणार आहे.

तिकीट खरेदीत ५ टक्‍क्‍यांची वाढ
मध्य रेल्वेच्या नोंदीनुसार नागपूर विभागात दररोज सरासरी ११ हजार प्रवाशांच्या आरक्षित तिकीट काढल्या जातात. दिवाळी दरम्यान त्यात वाढ होते. परंतु, दिवाळी संपल्यानंतर बुधवारी बुधवारी दिवसभरात तिकीट खरेदीत अचानक ५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविली गेली. बेमालूमपणे जुन्या नोटा खरेदी करण्यात आल्याने ही आकडेवारी फुगली असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

Web Title: railway ticket purchasing