esakal | विदर्भाला हुडहुडी, पाऊस आणि थंडीचा मुक्काम वाढणार
sakal

बोलून बातमी शोधा

rain and cold weather in Vidarbha

'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे सध्या मध्य भारतावर ढगांची दाटी झाली असून, त्याचा प्रभाव विदर्भातही जाणवतो आहे. कमाल तापमानात दोन ते पाच अंशांची वाढ झाल्याने दिवसा गारवा जाणवत आहे. याउलट किमान तापमानात मात्र किंचित वाढ झाल्याचे दिसून आले.

विदर्भाला हुडहुडी, पाऊस आणि थंडीचा मुक्काम वाढणार

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर  : ढगाळ वातावरणामुळे विदर्भात अचानक गारठा वाढला आहे. त्यामुळे नागपूरकरांना आज दिवसभर स्वेटर्स व मफलर्स घालून फिरावे लागले. पाऊस व ढगाळी वातावरण आणखी दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पावसाळी वातावरण आणि थंडीमुळे नागपूरकरही गारठले असून, तरुणाईचे थवेच्या थवे जागोजागी दृष्टीस पडत आहेत.

'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे सध्या मध्य भारतावर ढगांची दाटी झाली असून, त्याचा प्रभाव विदर्भातही जाणवतो आहे. कमाल तापमानात दोन ते पाच अंशांची वाढ झाल्याने दिवसा गारवा जाणवत आहे. याउलट किमान तापमानात मात्र किंचित वाढ झाल्याचे दिसून आले. गारठ्यामुळे नागपूरकरांना दिवसा काहीशी हुडहुडी भरली. त्यामुळे अनेक जण विशेषतः वाहनचालक दिवसभर स्वेटर्स व मफलर्स घालून फिरताना दिसले. 

हेही वाचा - मातोश्रीवर उरकला प्रेम विवाह अन् नामकरण सोहळा, पाणावले अनेकांचे डोळे
 

सकाळच्या सुमारास शहरातील काही भागांत हलका शिडकावादेखील झाला. पाऊस व ढगाळी वातावरण आणखी दोन-तीन दिवस राहणार असून, त्यानंतर थंडीचा कडाका वाढण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः डिसेंबरचा शेवटचा आठवडा वैदर्भींची परीक्षा घेणार आहे. हिवाळा सुरू होऊन दीड ते दोन महिने लोटूनही अद्याप कडाक्याची थंडी जाणवली नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला नागपूरचा पारा ११.२ अंशांवर गेला होता. उल्लेखनीय म्हणजे भारतीय हवामान विभागाने यंदा कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला होता. दोन वर्षांपूर्वी २९ डिसेंबरला नागपूरचा पारा विक्रमी ३.५ अंशांपर्यंत घसरला होता. 

जाणून घ्या - कोरंभीच्या नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाची पटली ओळख; प्रियकराच्या मदतीनं केला पतीचा खून
 

हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश पहाडी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. तेथील गारठायुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यातच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले. विदर्भातील सर्वच शहरांतील तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. 

पावसाळी वातावरण आणि थंडीमुळे सर्दी व खोकल्याचे आजारही वाढले आहेत. हवामान विभागाने या आठवड्यात पारा आणखी घसरण्याचे संकेत दिले आहेत. ढगाळी वातावरणामुळे पिकांचे नु्कसान होत आहे. या वातावरणाचा तूर आणि कपाशीला सर्वाधिक फटका बसत असल्याने निसर्ग आणखी किती छळणार असा प्रश्न शेतकरी हताशपणे विचारत आहेत.
 
संपादन : अतुल मांगे 

loading image
go to top