गोंदिया जिल्ह्यात पावसाचा मुक्काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

गोंदिया - मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाचा मुक्काम कायम आहे. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. 

काही भागांतील अतिवृष्टी पाहता मोठ्या प्रमाणावर नुकसानाच्या नोंदी आहेत. यात नदीकाठावर वसलेल्या गावांची परिस्थिती गंभीर आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात १३६८.६ मि. मी. पाऊस पडला असून, सरासरी ४२. ५ मि. मी. इतकी आहे. तालुक्‍यात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद सालेकसा येथे घेण्यात आली. 

मुसळधार पावसाचे संकेत जवळपास संपूर्ण जिल्ह्यात आहेत. लहान-मोठी धरणे, बोडी, तलाव, बंधारे ओसंडून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी धरणांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तिरखेडी बांध तसेच पुजारीटोला येथील धरणाची १४ पैकी १० दरवाजे उघडण्यात आल्याने ३२ हजार क्‍युसेक मीटर पाण्याचा विसर्ग झाला. 

या वेळी जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्यासह सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगडे, आमगावचे तहसीलदार राठोड, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व अन्य विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील हलक्‍या धानपिकाला बसला आहे. हे धानपीक येत्या आठवडाभरात निघण्याची चिन्हे होती; परंतु बांध्यांत पाणी साचल्याने हे पीक नष्ट झाले आहे.

अतिवृष्टीचा इशारा 

नागपूर येथील हवामान खात्याने १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नदीकाठी वसलेल्या ग्रामीण भागातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तालुकानिहाय पडलेला सरासरी पाऊस (मि.मी.मध्ये)

तालुका               पडलेला पाऊस 

गोंदिया                 ४७.७

गोरेगाव                 ३९.९

तिरोडा                 २७.३

अर्जुनी मोरगाव     ४१.०

देवरी                   ५४.१

सडक अर्जुनी         ४०.३

आमगाव               ४२.५ 

सालेकसा               ५०.०

Web Title: Rain destination district