गडचिरोलीत बरसल्या पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

गडचिरोली - अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एंट्री घेतली आहे. शनिवारी (ता. ११) जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळल्या. आषाढ मास निरोप घेत असताना श्रावणाच्या पूर्वसंध्येला बरसलेल्या सरींनी करपलेल्या पिकांना पुन्हा नवसंजीवनी दिली.

यंदा सुरुवातीला काही दिवस दमदार पाऊस झाला होता. त्या पावसाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत रोवणीची कामे आटोपली. पण, त्यानंतर पावसाने नाट्यमयरीत्या माघार घेतली. पाऊस आकाशात गडप झाल्याने शेतकरी चिंतित झाले होते. काही जणांनी रोवणी केली नव्हती. त्यांचे पऱ्हे जागेवरच सुकायला लागले होते. शनिवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला.

Web Title: rain in gadchiroli

टॅग्स