नागपूरात बरसल्या सरी

नागपूरात बरसल्या सरी

नागपूर - जवळपास दोन आठवड्यांच्या दीर्घ ब्रेकनंतर अखेर नागपूरकरांवर वरुणकृपा झाली. सायंकाळी नऊच्या सुमारास उपराजधानीत अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभराच्या उकाड्याने घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. 

प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारपासून विदर्भात दमदार पावसाची शक्‍यता वर्तविली होती. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पण, पाण्याचा एक थेंबही पडला नाही. पूर्व नागपुरात काही ठिकाणी हलका शिडकावा झाला. मात्र, रात्री साडेआठनंतर काळेकुट्‌ट ढग दाटून आले. मध्य नागपुरातील रामदासपेठ, धंतोली, गोकुळपेठ, छत्रपतीनगर, वर्धा रोडसह अनेक भागांत हलक्‍या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरूच होती. नागपूर जिल्ह्यात उमरेड परिसरातही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाने शुक्रवार व शनिवारीदेखील विदर्भात दमदार पावसाचा 

सायंकाळी बरसल्या सरी
इशारा दिला आहे. विशेषत: भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची दाट शक्‍यता आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या निम्मा पाऊस पडल्याने विदर्भात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जुलै महिना सर्वाधिक पावसाचा असल्यामुळे पुढील दहा-बारा दिवसांत जोरदार पाऊस आल्यास तूट भरून निघेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com