नांदेडमध्ये पाऊस; पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मृग नक्षत्राच्या आगमनाची वार्ता देण्यासाठी आलेल्या या मॉन्सूनपूर्व पावसाचे नांदेडकरांनी स्वागत केले आहे. या आधीही ३१ मे व १ जून रोजी असा पाऊस झाला होता.

नांदेड : शहर व परिसरात आज (गुरुवार) सकाळी आठपर्यंत गेल्या २४ तासांत सरासरी २९ मि.मी. पावसाची नोंद झाली. हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीची पाणीपातळी पावसाने वाढली आहे.

मृग नक्षत्राच्या आगमनाची वार्ता देण्यासाठी आलेल्या या मॉन्सूनपूर्व पावसाचे नांदेडकरांनी स्वागत केले आहे. या आधीही ३१ मे व १ जून रोजी असा पाऊस झाला होता. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातही रात्री व पहाटे पाऊस झाला.

नांदेड शहर, ग्रामीण, विष्णुपुरी, लिंबगाव, तुप्पा, तरोडा, वसरणी परिसरात हा पाऊस आज पहाटेच्या सुमारास झाला. गेले महिनाभर उष्णतेच्या काहिलीने त्रस्त झालेले नांदेडकर या पावसाने सुखावले आहेत. अर्धापूर तालुक्यात 95 मि.मि.पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसात अधून मधून पाउस झाल्यामुळे हळद लागवड सुरू झाली आहे. बि-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत.

Web Title: rain in Nanded