संततधारेनंतर विदर्भात पावसाची विश्रांती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : गुरूवारी विदर्भात संततधार बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली. हवामान विभागाच्या "रेड अलर्ट'नंतरही नागपुरात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पर्लकोटा नदीला आलेल्या पुराचे पाणी भामरागडात शिरल्याने येथील शंभराहून अधिक घरे पाण्यात बुडाली आहेत. इरई धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते. पुरामुळे जवळपास चारशे गावांचा संपर्क तुटलेला आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतुक बंद पडल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. मात्र मोजक्‍या भागांतच रिमझिम पडला. शहरात गेल्या चोविस तासांत 94 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain rest in Vidarbha