वऱ्हाडात रिमझिम पावसाची शेतीकामाला संजीवनी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

अकोला - दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रखडलेल्या पेण्यांनी वेग धरला असला तरी काही तालुके अद्यापही कोरडेच आहे. 

अकोला - दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रखडलेल्या पेण्यांनी वेग धरला असला तरी काही तालुके अद्यापही कोरडेच आहे. 

दोन दिवसांपासून वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. हा पाऊस शेतीकामासाठी संजीवनी ठरला आहे. रविवारपासून काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी रखडेल्या पेरणीला सुरुवात झाली. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे मात्र अद्याप तहानलेलीच आहेत. रविवारी ठिकठिकाणी कमीअधिक पाऊस पडला. 

अकोला जिल्ह्यात सरासरी २६.२ मि.मी. पासवाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली. सर्वाधिक पाऊस पातूर तालुक्यात ८१.८ मि.मी. झाला. त्याखालोखाल बाळापूर तालुक्यात ४६ मि.मी. पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात रिमझिम पाऊस आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २०.६ मि.मी. पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात सरासरी १९ मिलीमीटर पासवाची नोंद झाली.

बाभुळगाव मंडळात अतिवृष्टी
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात असलेल्या बाभुळगाव मंडळात अतिवृष्टी झाली. या मंडळात २४ तासात १४६ मि.मी. पावसाची नोंद झाली. लागूनच असलेल्या आलेगाव आणि चान्नी मंडळातही सरासरी ८० मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने बेलुरा ब. येथील पुलाचे नुकसाना झाले. त्यामुळे परिसरातील सात गावांचा संपर्क तुलटा. 

पूर्णा नदीची पातळी वाढली
अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ जाली आहे. पूर्णा नदीच्या सर्व उपनद्या दुथळी भरून वाहत आहे. शेगावजवळील मन नदीला पूर आला. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

अकोलाः ६.२, बार्शीटाकळी - १९.७, अकोटः ८, तेल्हारा - १५, बाळापूरः ४६, पातूर - ८१.८, मूर्तिजापूरः ६.८, सरासरी - २६.२  

बुलडाणा - २५.६, चिखली - ११, देऊळगावराजा - ११.२, सिंदखेडराजा - स१३.८, लोणारः २४.२, मेहकरः ३३.४, खामगाव - २०.९, शेगावः २२.६, मलकापूरः ३३.४, नांदुराः १०.२, मोताळाः ४८.३, संग्रामपूरः १३.२, जळगाव जामोदः ०, सरासरी - २०.६

वाशीमः११.८२, मालेगावः २५.३०, रिसोडः ३९.६२, मंगरूळपीरः ९.२९, मानोरा - १५.७८, कारंजा -  १२.१५ सरासरी - १९ 

Web Title: rain starts in vidarbha