पूर्व विदर्भात गारपिटीसह वादळी पाऊस

File photo
File photo

नागपूर : गडचिरोली, भंडारा, गोंदियात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हरभरा, गहू, जवस व लाखोरी पिकाला फटका बसला आहे.
तिरोडा तालुक्‍यात बोराएवढ्या गारांचा पाऊस पडला. गोंदिया शहरात पहाटेपासून सकाळी 8 पर्यंत ढगाळ वातावरण होते. या वेळेत तुरळक पाऊस झाला. सायंकाळी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या. तिरोडा तालुक्‍यातील नवेझरी परिसरात सायंकाळी बोराएवढ्या गारा पडल्या. अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी गारपिटीसह पाऊस झाला. सुमारे अर्धा तपास जोरदार पाऊस झाला. मोहाडी, करडी, तुमसर, लाखांदूर, साकोली तालुक्‍यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे आंब्याचा मोहोर गळाला आहे. तसेच भाजीपाल्याचेही नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत शुक्रवारी गारांसह पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका गहू, हरभरा व पालेभाज्या पिकांना बसला आहे. जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासूनच हवामानात बदल दिसून आला. ढगाळ वातावरणानंतर दुपारी उन्ह निघाली मात्र त्यानंतर वादळी वारा व गारांसह पावसाने झोडपून काढले. याचा सर्वाधिक फटका देसाईगंज परिसराला बसला. गडचिरोली शहरात सायंकाळी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com