वऱ्हाडात सर्वाधिक पाऊस वाशीम जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

कुठे दमदार, कुठे कोरडेच
गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही. कुठे दमदार, तर कुठे कोरडेच असल्याचा अनुभव येत आहे. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, मेडशीमध्ये गुरुवारी नागरिकांनी याचा अनुभव घेतला. अकोला शहर आणि परिसरतही हीच स्थिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात घाटा खाली पाऊस असतो तर वर नाही. घाटावर पाऊस असतो तेव्हा घाटाखालील भाग कोरडाच असतो.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ११७.४ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक २०१.४ मि.मी. पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यात झाली आहे. अकोला जिल्ह्याने सरासरी आेलांडली असून, बुलडाणा जिल्ह्यात मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

पश्चिम विदर्भात याहीवर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दीर्घ दडी मारली असून,अद्याप मान्सूनची सुरुवात झाली नाही; पण मान्सूनपूर्व पाऊस मात्र १ जून आणि २० व २१ जून रोजी काही जिल्ह्यात बऱ्यापैकी झाला. वऱ्हाडातील या पाच जिल्ह्यात २१ जूनपर्यंत सरासरी १०६. ८ मि.मी. पाऊस हवा होता. प्रत्यक्षात ११७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्याची स्थिती बघितल्यास आतापर्यंत सरासरी ९४.६ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५. २ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ११४.८ मि.मी.पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ९९.३ मि.मी.नोंद झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १२३.१ मि.मी. पाऊस आतापर्यंत अपेक्षित होता. प्रत्यक्षात १२९.७ मि.मी.तर अमरावती जिल्ह्यात सरासरी १०२.२ मि.मी.पाऊस अपेक्षित होता आजमितीस ९९.१ पावसाची नोंद झाली आहे.

कुठे दमदार, कुठे कोरडेच
गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही. कुठे दमदार, तर कुठे कोरडेच असल्याचा अनुभव येत आहे. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, मेडशीमध्ये गुरुवारी नागरिकांनी याचा अनुभव घेतला. अकोला शहर आणि परिसरतही हीच स्थिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात घाटा खाली पाऊस असतो तर वर नाही. घाटावर पाऊस असतो तेव्हा घाटाखालील भाग कोरडाच असतो.

शेतकरी सुखावला
वऱ्हाडात पाऊस कमी असला तरी वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पावसाची सरासरी वाढली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

Web Title: rain in washim