सीताबर्डी उड्डाणपुलावर पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

नागपूर - शहर आणि परिसराला शनिवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपले. शहराच्या चंदननगर भागात अनेक घरांत पाणी शिरले तर सीताबर्डी, सोमलवाडा, प्रतापनगरातील रस्ते जलमय झाले. पुढील तीन ते चार दिवस शहरात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

मॉन्सूनने शहरात हजेरी लावली असून सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर सूर्याचे दर्शन झाले. मात्र, सायंकाळी साडेसहाला आकाशात ढगांची गर्दी वाढली. साडेसातच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. अर्धा तासापेक्षा अधिक काळ पावसाने शहराला चांगलेच झोडपले. सायंकाळी खरेदी अथवा कामासाठी निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात पावसाचा जोर मोठा होता. तेथे रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते. शहरातील सर्वच भागांत पाऊस पडला. 

सीताबर्डी परिसरातही मेट्रोची कामे झपाट्याने सुरू आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर पाणी जमा झाले होते. येथील उड्डाणपुलाच्या शेजारी नदीचे स्वरुप आले होते. दरम्यान, एक सायकल चालक पडला. मात्र. त्याला दुखापत झाली नाही. याशिवाय चंदननगर भागातील घरांत पाणी शिरले. प्रतापनगर, सोमलवाडा, रामदासपेठ, सिव्हिल लाइन्स येथील रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. नेहरूनगर परिसरात झाडेही कोसळली. शहरात आठ जूनपासून पाऊस धडकला असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: rain Water on Sitabuldi Flyover