यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात मुसळधार 

file photo
file photo

नागपूर ः पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी रात्री पावसाने दिलासा दिला. यतवमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. तर भंडारा, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात तूरळक पाउस झाला. 

हे वाचा— कामठीत नागरिकांच्या घरांमध्ये शिरले कंबरभर पाणी; कोण आहे दोषी?
वर्धा जिल्ह्यात शनिवारी (ता. चार) सकाळी आठपर्यंत मागील 24 तासांत सरासरी 11.67 मिलिमीटर पाऊस झाला. हिंगणघाट तालुक्‍यात सर्वाधिक 38.91 मिलिमीटर, देवळी तालुक्‍यात 24.26 मिलिमीटर, तर वर्धा तालुक्‍यात 15.58 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सेलू, आर्वी, आष्टी, समुद्रपूर, कारंजा तालुक्‍यात तुरळक पाऊस झाला. शनिवारी (ता. चार) विविध ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या ढगाळ वातावरण कायम असून, रात्रीच्या सुमारास पावसाची शक्‍यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात 8 मिमी. पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात मागिल चोवीस तासांत 8.3 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वांत जास्त पावसाची नोंद दारव्हा तर सर्वांत कमी पावसाची नोंद पुसद तालुक्‍यात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. पावसाअभावी पीक करपण्याची भीती होती. शुक्रवारी (ता.तीन) जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने 'एन्ट्री'केली. पावसाने पिकांना संजीवनी मिळाली असली तरी काही भागात ढगफुटी सारखा पाऊस कोसळल्याने शेत खरडून गेले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने निघालेले पीक पाण्यात असून शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभे ठाकले आहे. 

पावसाने मारली दडी 
अमरावती जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या असल्या तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. शनिवारी (ता. चार) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाने आजसुद्धा दडी मारली. मृगनक्षत्राला सुरुवात झाल्यापासून अमरावतीकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नांदगावखंडेश्‍वर तसेच दर्यापूर वगळता अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मुसळधार पाऊस येणार, असे वाटत असतानाच केवळ दोन ते तीन मिनिटे सरी कोसळल्या. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पावसाच्या सरी आल्या.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com