पावसामुळे 44 गावांतील 109 घरांची पडझड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

गिरड (जि. वर्धा)  : समुद्रपूर तालुक्‍यात सलग 36 पडलेल्या पावसाने समुद्रपूर तालुक्‍याला झोडपून काढले. या अतिवृष्टीने तालुक्‍यातील 109 घरे बाधित झाली. तर शेकडो हेक्‍टर जमिनीवरील पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. या 36 तासात तालुक्‍यात 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून बंद झालेले मार्ग रात्री उशिरा पूर्वपथावर आले.

रविवार सकाळपासून संततधार सुरू झालेल्या पावसाने सोमवार रात्रीपासून चांगलाच कहर करीत तालुक्‍यातील गावांना जलमय केले. या पावसाने तालुक्‍यातील सर्वच लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्याने सकाळपासून कित्येक गावाचा संपर्क तोडला. वडगाव सावंगी या दोन्ही गावांतील नदीला पूर आल्याने गावा जवळ पाणी शिरून दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता. समुद्रपूर वर्धा मार्गावरील शेडगाव नदीला आलेल्या पुराने हा मार्ग बंद झाला होता. तर हिंगणघाट उमरेड मार्गावरील धोंडगाव गावा जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला होता. वाघाडी नदीला पूर आल्याने समुद्रपूर गोंड वायगाव मार्ग बंद झाला होता.
लालनाला प्रकल्पाच्या पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने कोरा गावाशी चिमूर हिंगणघाट, गिरड गावाचा संपर्क तुटला होता. रात्री उशिरापर्यंत हे सर्वच बंद मार्ग पूर्वपतावर आल्याने दिवसभर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. मात्र, या पावसाने तालुक्‍यातील समुद्रपूर मंडळातील 12 गावातील 26 घरे, मांडगाव मंडळातील सहा गावांतील 15 घरे, जाम मंडळातील सहा गावांतील 10 घरे, कांढळी मंडळातील 11 गावांतील 33 घरे, वायगाव गोंड मंडळातील 5 गावातील 12 घरे, गिरड मंडळातील चार गावांतील 13 घरे अशा एकूण 44 गावांतील 109 घरांची पडझड झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall hampered 109 houses in 44 villages