विदर्भात आजपासून मुसळधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

नागपूर : गुरुवारी सायंकाळी व त्यानंतर मध्यरात्री बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी "ब्रेक' घेतला. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाचा एक थेंबही पडला नाही. मात्र पुढील दोन दिवसांत वरुणराजा पुन्हा जोरदार "बॅटिंग' करण्याची दाट शक्‍यता आहे. हवामान विभागाने शनिवारपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधारेचा इशारा दिल्याने या "विकेंड'मध्ये पावसाचाच खेळ चालणार, हे निश्‍चित आहे.

सध्या विदर्भात सक्रिय असलेल्या मॉन्सूनने गुरुवारी उपराजधानीला चांगलाच दणका दिला. दुपारच्या हलक्‍या सरीनंतर सायंकाळी व मध्यरात्री शहरात सगळीकडेच जोरदार बरसला. सकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत शहरात तब्बल 108.4 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, यातील बहुतांश पाऊस गुरुवारी सायंकाळी सहा ते शुक्रवारी सकाळी सहा या बारा तासांतील होता.
पावसाने विदर्भात जोरदार पुनरागमन केले असले तरी, स्थिती अजूनही चिंताजनकच आहे. विदर्भात आतापर्यंत सरासरी 427 मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र केवळ 265 मिलिमीटरच पडला, जो सरासरीच्या 38 टक्‍के कमी आहे. सर्वाधिक चिंताजनक स्थिती यवतमाळ, वाशीम, अमरावती, गोंदिया, वर्धा आणि भंडारा या सहा जिल्ह्यांमध्ये आहे. तर कालच्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील तूट बऱ्याच प्रमाणात भरून निघाली आहे. जिल्ह्यात आता केवळ 24 टक्‍के तूट शिल्लक आहे. या आठवड्यात दमदार पावसाची शक्‍यता असल्यामुळे उर्वरित तूट भरून निघण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in Nagpur