esakal | धो-धो बरसला
sakal

बोलून बातमी शोधा

धो-धो बरसला

धो-धो बरसला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर मंगळवारीही शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारी बरसलेल्या धो-धो पावसाने उपराजधानीची चांगलीच दाणादाण उडविली. नागपूर वेधशाळेने बुधवारीही नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या मध्य भारतावर ढगांची दाटी आहे. याचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये दिसून आला. सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर आजही वरुणराजाने नागपूरकरांना चांगलेच झोडपून काढले. सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी दोननंतर अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. मध्य नागपूरसह शहरातील अनेक भागांत जवळपास तासभर जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी पाणी तुंबले होते. सकाळी साडेआठपर्यंत 30 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नागपूर वेधशाळेने बुधवारी विदर्भात अलर्ट दिला असला, तरी त्यानंतरही पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बाप्पा असेपर्यंत विदर्भात पावसाचा मुक्‍काम राहील, अशी चिन्हे दिसत आहेत.
loading image
go to top