पावसाने झोडपले, कंपनीनेही फसविले, तक्रार कुणाकडे? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

सावनेर(जि.नागपूर) ः यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची लागवड केली. लागवडीपासून संगोपनासाठी देखभाल व व्यवस्थापन केले. मात्र कपाशी उत्पादनाची स्थिती बघितली असता निदान लागवड खर्च तरी निघेल काय, या विवंचनेत सापडल्याची व्यथा मंगसा येथील शेतकरी सांगतात. 

सावनेर(जि.नागपूर) ः आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना यंदाच्या खरीप हंगामातही परतीच्या पावसामुळे शेत पिकांना फटका बसला आहे. कपाशी व सोयाबीन उत्पादकांचे कंबरडेच मोडण्याची यंदा दिसत आहे. तालुका कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समिती विभागाच्या वतीने पीक नुकसानाचे पंचनामे अहवाल बनविणे सुरू असताना पावसाने तर तर झालीच, त्याचबरोर कपाशीच्या बियाण्यांमुळे फसगत झाल्याचा आरोप मंगसा गावातील अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. 

मागील वर्षी दुष्काळातही गावातील एक्‍सेल कंपनीच्या इक्को वाणाच्या बियाण्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी पंधरा क्विंटल कापसाचे उत्पादन झाल्याने उमरी गावातील व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी फायदेशीर उत्पादनामुळे या वाणाची निवड केली. यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांची लागवड केली. लागवडीपासून संगोपनासाठी देखभाल व व्यवस्थापन केले. मात्र कपाशी उत्पादनाची स्थिती बघितली असता निदान लागवड खर्च तरी निघेल काय, या विवंचनेत सापडल्याची व्यथा मंगसा येथील शेतकरी सांगतात. 

कपाशीच्या झाडाला जवळपास निदान शंभर-दीडशे बोंडे तरी लागायला पाहिजे होती; मात्र कुठे चार, पाच तर कुठे आठ, दहा अशी बोंडे असून कपाशीवर चुरडा गेलेला आहे. त्यामुळे आता अधिक बोंडे लागणार नाहीत. आता फक्त कापसाच्या पऱ्हाट्या शिल्लक राहतील अशी स्थिती झाली असल्याचे शेतकऱ्याने काकुळतीला येत सांगितले. या स्थितीला कंपनीचे बियाणे जबाबदार असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पिकांची पाहणी केली. मात्र अद्यापही जबाबदार फिल्ड अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे शेतकरी म्हणाले. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती येथील कृषी विभागाला बोगस बियाण्यांमुळे आमची फसगत झाल्याची तक्रार करणार असल्याचे मंगसा येथील समस्याग्रस्त शेतकरी शालिकराम रहाटे यांनी "सकाळ'ला सांगितले. 
शेतात पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शालिकराम रहाटे, भागवत ढोपरे, मोरेश्वर चोरगडे, दयाल भजन, सुभाष रहाटे, तिलक चोरगडे, हेमराज धमदे, भुनीराज रहाटे, चंपत महाजन, संजय मुळे, गुलाबराव मुळे, ठाकरे, गोविंदा ठाकरे आदींसह मंगसा व उमरी येथील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rains hit, the company cheated too