निवडणूक लढणार नाही : डॉ. राजेंद्र गवई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

अमरावती : संपूर्ण देशाबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण तापायला लागले आहे. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीच्या उमेदवाराला ते समर्थन देणार आहेत. त्यामुळे अमरावतीत थेट किंवा तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.

सद्यस्थितीत अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ तसेच युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शिका नवनीत राणा यांच्यात थेट लढत होण्याचे संकेत आहेत. मात्र, वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे आधीपासूनच रिंगणात असल्याने ही लढत तिरंगीसुद्धा होऊ शकते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन पावले मागे येण्याचा सल्ला दिला व तो मी मान्य करून यंदा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. राजेंद्र गवई यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. अमरावतीत नवनीत राणा याच सक्षम उमेदवार ठरू शकतात असे मी त्यांना सांगितल्याचेसुद्धा डॉ. गवई यांनी स्पष्ट केले.
डॉ. राजेंद्र गवई यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात आजवर दोनवेळा निवडणुका लढविल्या असून यंदासुद्धा त्यांचे प्रयत्न सुरू होते. रिपाइंचे अधिकृत चिन्ह गोठल्याने डॉ. गवई यांना दुसऱ्याच चिन्हावर निवडणूक लढावी लागली होती. वारंवार पराभूत होऊन माणूस खचतो, असे ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajendra gawai will not contest the election