राजेश, भरत, शैलेश संयुक्तपणे आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

नागपूर ः जय साई फाउंडेशनतर्फे रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर अव्वल मानांकित तमिळनाडूचा व्हीएव्ही राजेश, आंध्रचा भरतकुमार रेड्डी आणि नागपूरचा शैलेश द्रविड प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. 13 खेळाडू प्रत्येकी पाच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. राजेशने अव्वल पटावर तमिळनाडूच्याच एस. प्रसन्नाला मात दिली. पाचव्या फेरीत नागपूरच्या सोनल मानधनावर मात करणाऱ्या पवन डोडेजाला सहाव्या फेरीत दिल्लीच्या संचित आनंदने बरोबरीत रोखले. प्रेरक दारव्हेकर, खुश वैरागडे, विवान सरोगी हे नागपूरचे खेळाडू सहाव्या फेरीत पराभूत झाले. प्रेरकचे चार तर खुश आणि विवानचे प्रत्येकी साडेतीन गुण आहेत. सिद्धांत गवईने मात्र आरुल प्रकाशवर मात करून आपली गुणसंख्या पाचवर नेली. अंश धनविजने तमिळनाडूच्या एम. नटराजनवर मात करून पाचवा गुण वसूल केला. रामविशाल परब आणि सोनल मानधना यांच्यातील डाव मात्र बरोबरीत सुटला. सहाव्या फेरीचे महत्त्वाचे निकाल ः व्हीएव्ही राजेश (6) मात एस. प्रसन्ना (5), कांतीलाल दवे (5) पराभूत भरतकुमार रेड्डी (6), शैलेश द्रविड (6) मात एस. विघ्नेश्‍वरन (4.5), पवन डोडेजा (5) बरोबरी संचित आनंद (5), ए. बालकिशन (5) मात सुधीर आचार्य (4), प्रवीण हेंड (4) पराभूत एसए कन्नन (5), संजित मनोहर (5) मात गौरव शर्मा (4), गजानन जायडे (5) मात जॉनी मंडल (4), हर्शेल गुप्ता (4) पराभूत विश्‍वनाथ कन्नम (5), आकाश कोळी (4.5) बरोबरी एस. कभिलान (4.5), सिद्धांत गवई (5) मात अरुल प्रकाश (4), प्रशांत कटियार (5) मात प्रेरक दारव्हेकर (4), एन. कार्तिक (5) मात सुहान देशपांडे (4), एम. नटराजन (4) पराभूत अंश धनविज (5), काव्यंश अग्रवाल (4) पराभूत केवल निर्गुण (4.5), कुणाल शिंदे (3.5) पराभूत रामनाथन बालसुब्रमण्यम (4.5), प्रथमेश गावडे (4.5) मात खुश वैरागडे (3.5), राजगोपालन (3.5) पराभूत गणेश ताजने (4.5), जतींदर कपूर (4.5) मात विवान सरोगी (3.5).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh, Bharat, Shailesh Joint leader in all india chess