महागावला खासदार राजू शेट्टींचा अन्नत्याग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

यवतमाळ - महागाव येथे रविवारी (ता. १९) होऊ घातलेल्या ‘एक दिवस...अन्नदात्यासाठीही’ या आंदोलनात राज्यातील नेतेमंडळी सहभागी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आपल्या कार्यकर्त्यांसह महागावात अन्नत्याग करणार आहेत.

जगाच्या पोशिंद्याच्या वेदनेचे राजकारण करीत सर्वांनीच जखमेवर फुंकर मारण्याचे काम केले. मात्र, आता बळीराजासाठी समाजातील सर्वच घटक एकवटत आहेत. १९ मार्च १९८६ला चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी व मुलाबाळांसह मृत्यूला कवटाळले. समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेला १९ मार्चला ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. स्मृतिदिनाचे औचित्य साधून चिलगव्हाणसह राज्यात आंदोलन होणार आहे. 

विदर्भवादी नेते ॲड. श्रीहरी अणे मुंबईत, तर महागाव येथील उपोषणात खासदार राजू शेट्टी, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार गुलाबराव गावंडे, आमदार आशीष देशमुख, आमदार ख्वाजा बेग, श्रीकांत तराळ, ॲड. नीरज खांदेवाले आदींचा सहभाग राहील.
 
युवा परिवर्तनचे यवतमाळात उपोषण
युवा परिवर्तन मंचचे सदस्य येथील समता (पोस्टल) मैदानासमोर रविवारी (ता. १९) सकाळी दहाला उपोषणाला बसणार आहेत. यात सहभागी होण्याचे आवाहन अविनाश गोटफोडे, अक्षय सावंत, रितेश बोबडे, शेखर सरकटे, निकेत मानकर, शिवानी जाधव, मयूरी कदम, पलाश झाडे आदींनी केले.

Web Title: raju shetty food sacrifice in mahagav