स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदनाला विरोध करणार नाही : राजू शेट्टी

श्रीधर ढगे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

सुकाणु समितीच्या इतर सर्व आंदोलनात आम्ही सोबत आहोत पण 15 ऑगस्टच्या बाबतीत आमची भूमिका वेगळी आहे. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे. तो आनंदाने साजरा करतात. त्यात अडथळा आणू नये अशी आमची भूमिका आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. या आंदोलनात शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.

खामगाव : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी आणि इतर मागण्या मंजूर करुण घेण्यासाठी सुकाणु समितीकडून आज संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी रास्तारोखो करण्यात आला.

त्याच पार्श्वभूमीवर आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात् रास्तरोखो करण्यात आला. तर खामगाव हे राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे होम टाउन असल्याने आंदोलन वेगळे वळण घेऊ नये. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

जवळपास चार तास या महमार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तर सुकानु समिति कडून उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या च्या झेंडा वंदन ला विरोध करण्याची जी भूमिका घेतली होती. त्या भूमिकेशी सहमत नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यानी खामगावात बोलताना केली. सुकाणु समितीच्या इतर सर्व आंदोलनात आम्ही सोबत आहोत पण 15 ऑगस्टच्या बाबतीत आमची भूमिका वेगळी आहे. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे. तो आनंदाने साजरा करतात. त्यात अडथळा आणू नये अशी आमची भूमिका आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. या आंदोलनात शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले.

Web Title: Raju Shetty talked about farmers agitation