भगिनींनो, सीमेवरील सैनिकांना पाठवा राखी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नागपूर - देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रति प्रत्येकच भारतीय नागरिकांच्या मनात कृतज्ञतेचा भाव असतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ’च्या माध्यमातून थेट सीमेवरील सैनिकांना राखी पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  

थंडी, ऊन, पाऊस, वादळवारा असो, हिमवर्षा असो की वाळूचे जीवघेणे वादळ; भारतीय सैनिक सीमेवर जागता पहारा देतात. ते जागतात म्हणून आपण सुखाने झोपू शकतो. म्हणूनच समस्त भारतीयांच्या मनात त्यांच्याप्रति अपार आदर असतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांचीही शत्रूपासून रक्षा व्हावी, अशी सदिच्छा त्यांना देऊया. त्यांना राखी पाठवून त्यांच्या दीर्घायूची मनोकामना करूया.

जे सैनिक देशाचे रक्षण करतात त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच आहे. ‘सकाळ’ राखी पाठवा अभियानात माझा सहभाग असतोच. आपणही सामील व्हा. 
- शिवाली देशपांडे, फ्लाइट लेफ्टनंट

काय करायचे 
आपल्यापैकी कुणीही सैनिकांना राखी पाठवू शकतो. आपल्या राखींसोबत बंद लिफाफ्यात दोन ओळीत सैनिक भावाला उद्देशून संदेश लिहिला तर स्वागतच आहे. सोबत आपले पासपोर्ट छायाचित्र किंवा ग्रुपच्या माध्यमातून राखी पाठवत असल्यास ग्रुप छायाचित्रही पाठवू शकता. संपूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता लिहावा. पाठविलेल्या प्रत्येकच भगिनींचा संदेश आणि छायाचित्र ‘सकाळ फेसबुक पेज’वर प्रसिद्ध करण्यात येईल. 

राखी पाठविण्याचा पत्ता 
संयोजक, सकाळ राखी अभियान, दैनिक सकाळ कार्यालय, २७४/३, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, नागपूर-४४००१० 
संपर्कासाठी मोबाईल ः ९८५०२०९९४५ 
(दुपारी १ ते रात्री ८ या वेळात फक्त) 

Web Title: rakhi pournima soldier