"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नागपूर - "टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न उभा ठाकला तो राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा. या समस्येचे खरे निराकरण नागपूर शहर पोलिसांकडे आहे. ते म्हणजे "रक्षा' ऍप. विशेष म्हणजे हे ऍप गुगल ऍपवर असल्याने त्याला राज्यव्यापी प्रतिसाद मिळतो. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी ऍप तयार केले आहे, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहान पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. 

नागपूर - "टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न उभा ठाकला तो राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा. या समस्येचे खरे निराकरण नागपूर शहर पोलिसांकडे आहे. ते म्हणजे "रक्षा' ऍप. विशेष म्हणजे हे ऍप गुगल ऍपवर असल्याने त्याला राज्यव्यापी प्रतिसाद मिळतो. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी ऍप तयार केले आहे, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहान पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. 

महिलांच्या सुरक्षेसाठी विविध नियम, कायदे, अधिकार असताना त्यांचे पालन शंभर टक्के होताना दिसत नाही. या कायद्यांबाबत लोकांमध्ये अनभिज्ञता दिसते. पोलिस ठाण्याची पायरी चढण्यापेक्षा प्रसंग विसरण्यातच महिला धन्यता मानतात, असा बऱ्याच अंशी अनुभव आहे. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी "अधिनियम, 2013' अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापण्याची तरतूद आहे. बहुतांश संस्थांमध्ये समितीच नाही. अनेक ठिकाणी ती केवळ कागदावरच असल्याने, महिलांना पुरेसा न्याय मिळत नाही. असाच आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेला आहे. मात्र, त्यालाही महविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आहे. 

या समस्येवर नागपूर पोलिसांचे "रक्षा' ऍप गुणकारी असल्याने त्याची राज्यात मागणी वाढते आहे. अवघ्या सहा महिन्यांत हे ऍप 7 हजारांहून अधिक जणांनी डाउनलोड केले. अनेकांचे प्रश्‍न सुटण्यास मदत झाली. याची निर्मिती "मॉडर्न व्ही आर सिक्‍युरिटी फोर्स'ने केली असून, ऍप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचा आणि आपल्या विश्‍वासातील दोघांचा क्रमांक त्यात नोंदवावा लागतो. संकटात पोलिसांची मदत पाहिजे, असे तुम्हाला वाटल्यास ऍपमधील एमर्जन्सी बटन दाबा. त्यानंतर सेकंदाभरात नोंदवलेल्या दोघांनाही तुम्ही संकटात असल्याचा संदेश जातो. 

रक्षा ऍपमध्ये गुन्ह्याची माहिती, छायाचित्र आणि व्हिडिओ पाठविण्याची व्यवस्था आहे. शिवाय, गुगल मॅपमुळे पत्ता सांगण्याची गरज नाही. ज्या भागातून "एमर्जन्सी कॉल' आला, त्या भागाचे गुगल लोकेशन थेट कुटुंबातील दोघांपर्यंत पोचतेच; शिवाय पोलिस ठाण्याला या संदर्भात कळविण्यात येते. जर प्रकरण राज्यातील अन्य शहरांमधील असेल, तर तिथल्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात येते. त्यामुळे कारवाईस मदत होते. 

पूर्वी 100 क्रमांकावर समस्यांची माहिती देण्याची व्यवस्था होती. तक्रार नोंदवून प्रत्यक्षात पोलिस पोचण्यात किमान 30 मिनिटे लागायची. मात्र, रक्षा ऍपमुळे हा अवधी घटल्याने अवघ्या 10 मिनिटांत कारवाई होऊ शकते. शिवाय, ऍपधारकाची व त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांची माहितीदेखील पोलिसांकडे असल्याने त्याचाही फायदा होतो, असे अधिकारी सांगतात. 

रक्षा ऍप फायद्याचेच 
पूर्वी कोणत्याही महिलेला समस्येच्या निराकरणासाठी पोलिस ठाणे गाठावे लागे. आता "रक्षा' ऍपमुळे एका क्‍लिकवर संकटातील महिलेपर्यंत सुरक्षा यंत्रणा पोहोचू शकते, त्यामुळे हे ऍप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणे आवश्‍यक आणि उपयुक्तच आहे. 

- किशोर सुपारे, पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष, नागपूर शहर पोलिस 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारतातील सर्वोत्तम ऍप 
1. माय सेफ्टिपिन 
2. स्मार्ट 24 बाय 7 
3. हिंमत (मुख्यत्वे दिल्लीसाठी) 
4. रक्षा 
5. बी सेफ 

Web Title: Raksha App Women's Protector