राळेगावच्या कृषी विस्तार अधिकाऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

राळेगाव (जि. यवतमाळ) : येथील पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शरद ईखे यांनी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

राळेगाव (जि. यवतमाळ) : येथील पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शरद ईखे यांनी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली.
शरद ईखे (वय 52, मूळ रा. अमरावती) दहा वर्षांपासून राळेगाव पंचायत समितीच्या कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी (ता. 25) त्यांनी पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात कीटकनाशक घेतल्याचे मित्रांना सांगितले. त्यानंतर त्यांना लगेच यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.26) त्यांचे मूळगाव अमरावती येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ईखे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ralegaon Agricultural Extension Officer Suicide