निवृत्ती योजना रद्द करण्यासाठी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रीय निवृत्ती योजना तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी दिल्लीत लोकसभेवर मोर्चा काढण्यात आला. 

नागपूर - राष्ट्रीय निवृत्ती योजना तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी दिल्लीत लोकसभेवर मोर्चा काढण्यात आला. 

या वेळी सिटूचे सचिव कॉ. तपनसेन यांनी, राष्ट्रीय निवृत्ती योजना सरकारने रद्द करावी. कंत्राटी आणि नैमित्तिक कर्मचाऱ्यांना समान काम, समान वेतन, खासगीकरण आउटसोर्सिंग बंद करण्याच्या मागण्यांवर प्रकाश टाकला. केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्ती योजना रद्द करावी. त्यासोबतच डिफाइंड पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे. कंत्राटी कर्मचारी व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावे, सर्व रिक्त पदे भरून वैधानिक सेवा भरती नियमानुसार अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाच्या अनुशेष दूर करावा, शासकीय विभागाचे खासगीकरण थांबवून सरकारी सेवेचे आउटसोर्सिंग बंद करावे. पाच वर्षांतून एकदा वेतन सुधारणा करावी, केंद्र सरकारने पर्याप्त निधी द्यावा.

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध कारवाई करावी, या मागण्यांचा मोर्चात उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी अशोक दगडे, चंद्रहास सुटे, बुधाजी सुरकर, प्रकाश डोंगरे, ज्ञानेश्‍वर महाल्ले, केशव शास्त्री उपस्थित होते.

Web Title: rally for retirement scheme cancel