राईनपाडा हत्याकांडाच्या निषेधार्थ डवरीगोसावी समाजाचा विधानसभेवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नागपूर : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील पाच जणांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (ता.16) सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे नाथजोगी समाजाच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नागपूर : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील पाच जणांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ येत्या सोमवारी (ता.16) सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात नागपूर येथे नाथजोगी समाजाच्यावतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नाथजोगी समाज मुळचा पश्चिम महाराष्ट्रातील आहे.राज्यातील वेगवेगळ्या भागात फिरून भिक्षा मागणे, भैरवनाथाची आरती करणे, पतार भरणे, डवर पुजणे यासारखी धार्मिक कार्य करून आपला उदरनिर्वाह करीत असतो. यातून मिळणारा शिधा व इनाम यातून गुजराण करीत आहे. राज्यभरात हा समाज प्रदेश वेगवेगळ्या नावाने ओळखला जात असून या नाथजोगी समाजाला विदर्भात नाथजोगी, खानदेशात भराडी व पश्चिम महाराष्ट्रात नाथपंथी डवरी गोसावी या नावानी ओळखला जात आहे.या समाजाच्या एकाच कुटूंबात वेगवेगळ्या नोंदी असल्याने तसेच भटका समाज असल्यामुळे हा समाज शिक्षण ,नोकऱ्या यापासून वंचिता आणि उपेक्षित आहे.सध्यातरी या समाजाकडे भविष्य, ज्योतिषी, भिक्षुकी
वाचून दुसरा पर्याय नाही. यातून हा समाज राज्यभर फिरत असतो. या भटकंती करीत असतानाच धुळे येथे पाच जणांची ठेचून जमावाने हत्या केली.

राज्यभर फिरणारा हा समाज या घटनेने भयभीत  झाला आहे. त्यामुळे या समाजाला भविष्यात अशा प्रसंगाला समोरे जावू लागू नये म्हणून  फिरस्ती प्रमाणपत्र मिळावे ही प्रमुख मागणी आहे. या मागणीसह या हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे. पिडीत कुटुंबांना 20 लाखांची मदत मिळाली पाहिजे. सर्व कुटुंबाचे पुनर्वसन सरकारने करावी. या मागण्यासाठी हा माहामोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. यासाठी स्रीनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातून नारायण बाबर, प्यारेलाल शिंदे, सिधु शास्त्री, ईश्वर चव्हाण, नारायण तांबे, भाऊलाल बाबर, एकनाथ शिंदे, सागर शेगर, बाबाराव सोळंखी, पांडुरंग शेगर, दिगंबर शिंदे, दादा शिंदे, गोटू जगताप, धर्मा बाबर, नामा बोरसे, सुरेश शिंदे, उत्तम कोष्ठ, प्रकाश चव्हाण, काशीनाथ शिंदे, शंकर यडवकर, राजू शिंदे, भाजीनाथ माळवे, चंद्रभान शिंदे, धनेश सावंत, भागवान सावंत, मोहन शेगर या नाथजोगी समाजाच्या विदर्भातील कार्यकर्त्यांनी या महामोर्चासाठी समाजाच्या लोकांना मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.

Web Title: rally on vidhan sabha for rainpada murder case