कॉंग्रेसने गरिबी नाही, गरिबांना हटवले - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

नागपूर -  कॉंग्रेसने "गरिबी हटाओ'चा नारा दिला. परंतु, त्यांनी गरिबी नाही तर गरिबांनाच हटवले, अशी टीका करतानाच मला बंगल्यावरून बाहेर काढणाऱ्यांना आम्ही सत्तेतून बाहेर काढले, असा टोलाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता. नऊ) लगावला. बौद्ध समाज आपल्या पाठीशी आहे, अशा शुभेच्छाही त्यांनी केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना प्रचार सभेत दिल्या. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणानंतर रामदास आठवले यांनी कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली व नितीन गडकरी आणि कृपाल तुमाने यांना शुभेच्छाही दिल्या. "आज विदर्भात आले आहेत अमित शहा... जिंकणार आम्ही महायुतीच्या जागा दहा... नाना पटोलेंकडे वाकड्या नजरेने पाहा आणि सर्वांनी नितीन गडकरींसोबत राहा' या कवितेवर टाळ्यांचा कडकडाट झाला. 

"मैं नागपूर में आया हूँ महायुतीको जमाने... रामटेकसे चुनके आएँगे कृपाल तुमाने', "नितीन गडकरी आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र... कारण माझ्या हृदयात आहे माझ्या भीमाचे चित्र', "नानाला इकडे यायचे असेल तर येऊ द्या... निवडणुकीनंतर पुन्हा गोंदियाला जाऊ द्या' यासारख्या चारोळ्यांनीदेखील त्यांच्या भाषणात रंगत आणली. "भाजप-सेना जातीवादी असल्याचे सांगून बदनामी करण्यात आली. परंतु, हे दोन्ही पक्ष सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची कामे जेवढी या सरकारच्या काळात झाली, तेवढी यापूर्वी कधीच झाली नाही. बुद्धिस्ट सर्किट असो किंवा इंदूमिलमधील स्मारक असो, प्रत्येक कामात या सरकारने तत्परता दाखविली आहे. कॉंग्रेसने मला आणि माझ्या समाजाला फसवले आहे,' असेही रामदास आठवले म्हणाले. "मला रामटेकमधून लढायचे होते. पण, भाजप-सेनेची युती आहे. याठिकाणी कृपाल तुमाने उभे आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत,' असे म्हणत "तुम्हा दोघांची झाली युती आणि माझी झाली माती', अशी मिष्किलीही त्यांनी केली.

Web Title: Ramdas Athavale criticized the Congress in nagpur