सत्ता कशी मिळवायची ते माझ्याकडून शिका; आठवलेंचा आंबेडकरांना टोला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

वंचितांना एकत्र करून सत्ता मिळवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न चालूच आहे. मात्र ही सत्ता कशी मिळवायची हे आंबेडकरांनी माझा कडून शिकावे असा सल्लावजा टोला सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी अकोल्यातील जाहीर सभेत लगावला.

अकोला : वंचितांना एकत्र करून सत्ता मिळवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न चालूच आहे. मात्र ही सत्ता कशी मिळवायची हे आंबेडकरांनी माझा कडून शिकावे असा सल्लावजा टोला सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी अकोल्यातील जाहीर सभेत लगावला. अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर रिपब्लिकन पक्षाच्या 62 व्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

'अजित पवार यांनी राणेंकडे केली पैशांची मागणी'

आठवले म्हणाले, रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर जर एकत्र येणार असतील तर त्यांना आम्ही पक्षाचा प्रमुख करू. त्यांनी एकत्र यावे पण ते येत नाहीत पण भविष्यात अशी एखादी वेळ आली प्रकाश आंबेडकर अन् मी एकत्र आलो तर देशाच्या राजकारणात चांगला बदल होईल. कवाडे, खोब्रागडे हे माझ्यासोबत एकत्र राहिले नाहीत मी शरद पवार यांना म्हटले होते आम्ही जर एकत्र आलो तर आम्हाला सत्तेत 30 टक्के वाटा द्यावा त्यांनी मान्य केले होते.

Vidhan Sabha 2019 : खडसे म्हणतात, 'पक्षाने चांगला निर्णय घेतला'

मात्र, प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले नसल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. त्यावेळी शरद पवार आणि आम्ही एकत्र आलो असतो तर आमचे 40 आमदार निवडून आले असते. ती वेळ निघून गेली असल्याचे आठवले म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athavale speaks about Prakash Ambedkar at Akola