रामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, मनपा सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, माजी महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.
पूर्वीच्या अस्तित्वातील 100 वर्षे जुन्या कमानी पुलाऐवजी नवीन 6 पदरी नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याच्या सुधारित प्रस्तावास रेल्वे विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार सुधारित प्रस्तावाप्रमाणे बांधकामासाठी 69.62 कोटी खर्च आला आहे. संत्रा मार्केट येथील 6 पदरी केबल स्टेड रेल्वे उड्डाणपुलाचे काम नागपूर शहर एकात्मिक योजनेत समाविष्ट असून 350 कोटी खर्चाची योजना शासनाने बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर मंजूर केली होती.

केबल स्टेडच्या माध्यमातून राज्यात वांद्रे वरळी सागरी सेतूनंतर हा पूल तयार करण्यात आला. युती शासनाच्या काळात याच्या कामाला मंजुरी मिळाली. चार वर्षांत हा पूल तयार करण्यात आला. यामुळे नागपूरकरांचा प्रवास अधिक सुखद होईल.
- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम)

Web Title: Ramjula flyover open to the citizens