रामटेक, काटोल भाजप सोडणार नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नागपूर : जिल्ह्यातील रामटेक आणि काटोल या दोन विधानसभा मतदारसंघांवर युतीमध्ये शिवसेनेकडून दावा केला जात आहे. रामटेकमध्ये 2014 चा अपवादवगळता 15 वर्षे शिवसेनेचे आशीष जयस्वाल आमदार राहिले आहेत. यावेळी ते दावा करणार असल्याची चर्चा असून काटोलवरही शिवसेनेचे नेते दावा सांगत आहेत. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, "सीटिंग-गेटिंग' फार्म्युल्यानुसार जागावाटप होणार आहे. रामटेक आणि काटोल विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत भाजपचेच आमदार आहेत. त्यामुळे या दोन जागा सोडण्याचा प्रश्‍नच येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
भाजपचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. योग्य वेळेवर त्यांची नावे घोषित करू', असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. या विषयावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता, ते म्हणाले की, "ही त्यांची अखेरची तडफड आहे. आता काहीच मार्ग दिसत नसल्याने निराशेतून त्यांनी हे विधान केले', असे ते म्हणाले. माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असतील, तर तो त्यांचा निर्णय आहे. राहायचे की, इतरत्र जायचे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आपण त्यावर काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. भाजपच्या जिल्ह्यातील दोन आमदारांना बदलविण्यात येणार आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात त्यांना विचारले असता, येत्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना कायम ठेवायचे की, त्यांना बदलवून नवीन उमेदवार द्यायचे, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाची केंद्रीय समिती घेईल, असे म्हणत जास्त बोलण्याचे टाळले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramtek, Katol will not leave BJP