जी. डी. जांभूळकरांचे बंड थंड

file photo
file photo

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारासंघातून बंडखोरी करणारे जी. डी. जांभूळकर यांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून अर्ज मागे घेतला असून, आता आपण कॉंग्रेसचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले.

जी. डी. रामेटकमधून लढण्यास इच्छुक होते. त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारीसुद्धा मागितली होती. मागील आठ ते दहा महिन्यांपासून त्यांनी स्वतःचा प्रचारही सुरू केला होता. राहुल गांधी यांनी निर्माण केलेल्या शक्ती प्रोजेक्‍टमध्ये हजारो लोकांना जोडले. मात्र, कॉंग्रेसने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज जांभूळकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र कॉंग्रेसने त्यांची समजूत काढून उमेदवारी मागे घ्यायला लावली. पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य करून आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे जांभूळकर यांनी जाहीर केले. यावेळी बंडोपंत टेंभुर्णे, मालिनी खोब्रागडे, निरंजन राऊत, लालचंद लवात्रे, हनवंत डोंगरे, संगीता खोब्रागडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com