राणे अहवालातील आकडेवारी तपासणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नागपूर - आरक्षणासंदर्भात राणे समितीने मराठा आणि कुणबीबहुल भागांचेच सर्वेक्षण केले होते. अनेकांना मराठा गृहित धरून संख्या वाढविल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे मराठा समाजासंदर्भात नव्याने अहवाल सादर करताना राज्य मागासवर्ग आयोगातर्फे काटेकोर दक्षता घेण्यात येत आहे. याशिवाय मराठा असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा तपासले जातील. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

एम. जी. गायकवाड यांच्या उपस्थितीत विभागवार सुनावणी घेण्यात येत आहे. मराठवाड्यानंतर ते आज सुनावणीसाठी नागपूरला आले होते. त्यानंतर नाशिक, पुणे, मुंबईतही सुनावणी होईल. ही सुनावणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर आयोग लवकरात-लवकर आपला अहवाल शासनास सादर करेल. सुनावणीदरम्यानच सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. मराठवाड्यात सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण होत आहे. हे सर्वेक्षण आयोगाच्या देखरेखीत होत आहे. यासाठी प्रश्‍नावलीही आयोगानेच तयार केली आहे. सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांची निवड करण्यात आली आहे. याच पाच तालुक्‍यांतील दोन मराठाबहुल गावांमध्ये जाऊन प्रत्येक घरी भेट देऊन त्यांची माहिती घेण्यात येईल. हे लोक मराठा आहे की नाही, याचा पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड किंवा ज्यात मराठा जातीचा उल्लेख आहे, अशा कागदपत्राची तपासणी करण्यात येईल.

Web Title: rane committee report checking

टॅग्स