रांगोळीला मिळतोय "इको फ्रेंडली' रंग 

file Photo
file Photo

वेलतूर (जि.नागपूर):  सतत झालेल्या पावसाने पाठ फिरविताच दसरा उत्सवापासून गावातील अंगणाला आता शेणाच्या सडासमार्जनासह रांगोळीचा रंग चढू लागला आहे. घराघरांसमोर सजणा-या रांगोळीला आता चांगलाच भाव आला आहे. परंतु पारंपरिक रांगोळ्यांपेक्षा रासायनिक प्रक्रियेतून तयार करण्यात येत असलेल्या रांगोळयांना पहिली पसंती मिळत आहे. 
वेलतूर व परिसरात आमनदी व वैणगंगा नदीकाठावर व तिला जुळणाऱ्या नाल्यात वरची माती खोदून साफ केल्यावर अनेक ठिकाणी पांढरा शुभ्र, स्वच्छ चुनखडीसारखा दगड निघायचा. तो घरी डोक्‍यावर, बैलगाडीतून आणून त्याला वाळवून त्याचे पिठ तयार केले जायचे. वस्रगार केल्यानंतर त्याचा रांगोळी म्हणून उपयोग केला जात असे. नाले व नदीकाठ गोसेखुर्द धरणाचे पाण्याखाली बुडून असल्याने रांगोळीच्या खाणी नामशेष झाल्या आहेत. यातून अनेकांना दिवाळीचा हंगामी रोजगार मिळत असे. तो रोजगार आता पुरता बुडाला आहे. आंभोरा, मालोदा, पोहरा, चन्ना, केसोरी, शिवनी, चिचाळ, कुजबा, पौणी, मेढा, धामणी, म्हसली, खराडा, जिवनापूर, फेगड, सिर्सी, नवेगाव या पंचक्रोशीतील गावात रांगोळीनिर्मितीचे व विक्रीची मोठे केंद्रे होती. आता सारेच जलसमाधीस्त झाले आहे. यातून मोठा रोजगार निर्माण व्हयचा तो रोजगारच आता गारद झाला आहे. मात्र त्याच्या आठवणी नव्या पुनर्वसित गावठाणातही त्यांना बेचैन करत आहेत. 
पूर्वी रांगोळीविक्रेते रांगोळी रोखीने म्हणजे रूपया, पैशात तिची देवाणघेवाण न करता धान्याच्या बदल्यात करायचे. आता स्वरूप बदलले असून अधिक शुभ्र व चटकदार रंगात दिसावी म्हणून रांगोळीवर अनेक रासायनिक प्रक्रिया करून आकर्षित वेष्टणात वजनाने कंपनीच्या ब्रॅंड नेमनेही विकल्या जात आहे. एवढेच नव्हे तर श्रीमंतांच्या ति.चशसकउे मिळविले आहे. मात्र परिसरात सहजपणे मिळणारी रांगोळी आता दुरापास्त झाली आहे. रांगोळीला भारतीय अंगणाचा दागिणा म्हणूनही मान आहे. रांगोळीशिवाय भारतीय कुठलाच सण संपन्न होत नाही, हे विशेष. 
व्यवसाय पोहचला "मॉल'मध्ये 
पारंपरिक ठिपक्‍यांच्या रांगोळीसोबत आकर्षक डिजायनच्या रांगोळ्या काढण्याकडे गृहीणींचा अधिक कल आहे. त्यासाठी त्या इंटरनेटचा वापर करताना दिसतात. काहींनी रांगोळया रेखण्याच्या कलेला आपला व्यवसायच बनविला आहे. त्यात महिलांसवे पुरुष कलाकारही पुढे आहेत. रांगोळी ही अस्सल भारतीय प्राचीन राजाश्रयप्राप्त कला आहे. आता तिचे "डिजिटलायजेशन' झाल्याने ती विदेशातही पोहचली आहे. विदेशात तिचे आता "लाईव्ह प्रोग्राम' होऊ लागले आहेत. पर्यावरण राखण्यासाठी पर्यावरणपूरक रांगोळीचा प्रयोग अनेकांना भावू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com