रणजित पाटलांची कन्या होणार प्रताप सरनाईकांची सून

purvesh-kashmira
purvesh-kashmira

अकोला : गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची कन्या कश्‍मिरा लवकरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा पुत्र पुर्वेश यांची ‘गृहमंत्री’ होणार आहे. त्यांची सोयरिक रविवारी पक्की झाली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचा येत्या मे महिन्यात विवाहाचा बार उडणार आहे.

डॉ. पाटील यांची कन्या कश्मिरा ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित आहे. ठाणे जिल्ह्यात सेनेचे आक्रमक नेते म्हणून आमदार प्रताप सरनाईक सुपरिचित आहेत. त्यांचे चिरंजीव असलेले पुर्वेश सध्या ठाणे महापालिकेत नगरसेवक असून, युवासेनेचे सचिव आहेत. मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेले सरनाईक कुटुंब ठाणे येथे स्थायिक झाले अाहे. आमदार सरनाईक यांची विहंग नावाची मोठी व्यावसायिक कंपनी आहे. राजकारणातील दबदब्या बरोबरच सरनाईक यांचे आर्थिक साम्राज्य मोठे आहे. रविवारी मुंबईत घरगुती समारंभात ही सोयरीक पक्की झाली. फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा करून मेमध्ये लग्नाचा बार उडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com