‘आई, माझा गणिताचा पेपर गं...’

Exam
Exam

टेकाडी - नजीकच्या गोडेंगाव पाल नगर येथे ११ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग व जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी पीडिता शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच ‘आई मी इथे कशी, माझा गणिताचा पेपर गं’ या तुटक्‍या शब्दात विचारणा केली अन्‌ आप्तांचे डोळे पाणावले. 

या प्रकरणातील आरोपी आतिश यादव याने अतिप्रसंग करण्यापूर्वी ज्यूसमधून गुंगीचे औषध दिल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेच्या दिवशी घरी व गावात कुणी नसल्याची संधी साधून आरोपीने अतिप्रसंगानंतर हातपाय बांधून बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी (ता. १९) बेशुद्ध अवस्थेत पीडितेला रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तीन दिवस जीवनमृत्यूशी झुंज देत होती.

रविवारी (ता.२१) व्हेंटीलेटर काढल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.पी. मांजरेकर यांनी दिली. तब्बल ७२ तासांनी शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने आईशी संवाद साधला. यावेळी तिने ‘अंकलने मुझे ज्यूस दिया था, मै तो खेल रही थी’ असे सांगितले.

गुंगीचे औषध दिले
पीडितेने साधलेल्या संवादानुसार, आरोपीने गुंगीचे औषध दिले असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. परंतु वैद्यकीय चाचणीत किंवा पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. पीडिता कुटुंबीयांना सफरचंद खायला मागते व घरी कधी जायचे याची विचारणा करीत आहे. मृत्यूच्या दाढेतून मुलगी बचावली एवढेच सुख सध्या कुटुंबीयांना आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कुटुंबीय करीत आहेत. 

पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिचे बयाण नोंदविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुंगीचे औषध दिल्याचे अद्याप तरी डॉक्‍टरांनी सांगितलेले नाही. 
- मोनिका राऊत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com