अकरावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती झाल्याने गुन्हा दाखल

अनिल कांबळे
गुरुवार, 17 मे 2018

गिट्‌टीखदानमध्ये राहणारी पीडित 17 वर्षीय मुलगी ही टिना (बदललेले नाव) अकराव्या वर्गात शिकते. तिचे वडील चौकीदार तर मोठा भाऊ मजूर म्हणून कंपनीत आहे. तिच्या भावाशी 2016 मध्ये आरोपी अक्षय राजेंद्र सोनवणे (वय 21, रा. आठवा मैल, वाडी) याची मैत्री होती.

नागपूर : "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थिनीवर युवकाने सतत तीन महिने बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर त्यांच्यात बाळावरून वाद झाला. त्यामुळे युवतीने पोलिसात बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.

गिट्‌टीखदानमध्ये राहणारी पीडित 17 वर्षीय मुलगी ही टिना (बदललेले नाव) अकराव्या वर्गात शिकते. तिचे वडील चौकीदार तर मोठा भाऊ मजूर म्हणून कंपनीत आहे. तिच्या भावाशी 2016 मध्ये आरोपी अक्षय राजेंद्र सोनवणे (वय 21, रा. आठवा मैल, वाडी) याची मैत्री होती. त्यामुळे तो नेहमी घरी येत होता. कौटूंबीक संबंध निर्माण झाल्यानंतर अक्षय आणि टिनाची ओळख झाली. दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यावेळी ती नववीत शिकत होती. तेव्हापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते.

अक्षयने रिक्षा विकत घेतली, तर टिना कॉलेज करीत होती. परीक्षा संपताच दोघांनी
घरून पळ काढला. दोघेही वाडीत भाड्याने खोली करून "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. यादरम्यान दोघांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती झाली. तिचे वय केवळ 17 वर्षे असल्यामुळे तिला गोळ्या देऊन गर्भपात करून घेतला. त्यानंतर ते तीन महिन्यापर्यंत त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. यादरम्यान अक्षयने अल्पवयीन टिनाचे वारंवार लैंगिक शोषण केले. आठवडाभरापूर्वी दोघांत कोणत्यातरी वादातून खटके उडाले. दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले. त्यामुळे टिना अक्षयचे घर सोडून माहेरी आली. तिने आईला हकीकत सांगितली आणि थेट गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठले. तिने अक्षयविरूद्ध बळजबरी शारीरिक संबंध
प्रस्थापित केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला
अटक केली.

Web Title: rape case in Nagpur